Namo Shetkari Yojana – Beneficiary Status, List, Registration, Intallment Check

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल.

जर का तुम्ही प्रधान मंत्री पी एम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळतील.

प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र शासनाद्वारे ६००० रुपये तसेच राज्य शासनाद्वारे ६००० एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

💡सरकार ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा करेल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 
(९०% शासन अनुदान)
PM Kisan Status Check
(19th Installment)
माझी लाडकी बहीण योजना
(१,५०० रुपये)
नमो शेतकरी योजना 6th Installment Date
PM Vishwakarma Yojana

योजनानमो शेतकरी महासम्मान निधी योजना
कोणासाठीमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी
ने लाँच केलेमहाराष्ट्र शासन (2023-24)
लाभवर्षाला ६००० रुपये तीन हफ्त्या मध्ये
Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Maha-Samaan Yojana

नमो शेतकरी योजना लाभार्थी स्टेटस लिस्ट

Namo Shetkari Yojana Status List बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे १) मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा उदाहरणासाठी आम्ही रेजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा.

namo shetkari yojana status

शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल यार तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.

Namo Shetkari Yojana Installment

नमो शेतकरी योजनेच्या बातम्या, अपडेट्स मिळवण्यासाठी Whatsapp आणि Telegram चॅनेल चे सदस्य व्हा.


नमो शेतकरी योजना रेजिस्ट्रेशन

नमो शेतकरी योजने साठी तुम्हाला रेजिस्ट्रेशन करण्याची आवशक्यता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सम्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकरऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, जर का तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजने साठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून यो दोन्ही योजनांचा लाभ घ्या.


खाली कमेंट करुण आम्हाला कळवा की तुम्हाला योजनेचा हफ्ता मिळाला आहे की नाही.

FAQ’s

NSMNY योजनेचा हप्ता कालावधी?

एप्रिल – जुलै, ऑगस्ट – नोव्हेंबर आणि डिसेंबर – मार्च

NSMNY योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

NSMNY योजनेसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. PM KISAN नोंदणीकृत पात्र लाभार्थी हे NSMNY चे लाभार्थी आहेत.

NSMNY योजनेत लाभ मिळालेली रक्कम?

रु. 6000/- वार्षिक तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातील.

योजनेचा पेमेंट मोड?

पेमेंट मोड म्हणजे आधार.

NSMNY साठी DBT सक्षम बँक खाते आवश्यक आहे का?

होय, NSMNY योजनेचा लाभ फक्त DBT सक्षम बँक खात्यात जमा होतो.

बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे का?

होय, NSMNY चा लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

NSMNY योजनेचे पात्रता निकष?

लाभार्थी पीएम किसान योजनेत पात्र असावा.

NSMNY नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. NSMNY चा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेत नोंदणी करावी लागेल.

मी पोर्टलवर शेतकऱ्याची नोंदणी करू शकत नाही. त्यात आधार क्रमांक आधीच नोंदणीकृत असल्याचे म्हटले आहे. मी कसे पुढे जाऊ?

असे होऊ शकते की शेतकऱ्याने आधीच PM-KISAN पोर्टलवर स्व-नोंदणी मोडद्वारे स्वतःची नोंदणी केली आहे. अशा परिस्थितीत, शेतकरी कॉर्नर विभागातील PM-KISAN पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर “स्वयं-नोंदणी/CSC शेतकऱ्यांची स्थिती” अंतर्गत शेतकऱ्याने स्वत: ची नोंदणी केली आहे का ते तुम्ही तपासू शकता.

अर्जातील काही त्रुटींमुळे एका शेतकऱ्याचा अर्ज चुकीच्या पद्धतीने नाकारण्यात आला आहे. मी PM-KISAN पोर्टलवर थेट डेटा एंट्रीद्वारे शेतकऱ्याची नोंदणी करू शकत नाही. मी कसे पुढे जाऊ?

अशा परिस्थितीत, शेतकऱ्याने PM-KISAN पोर्टलवरील शेतकऱ्याच्या कॉर्नरमधील “स्वयं-नोंदणीचे अद्ययावतीकरण” विंडोद्वारे आपला अर्ज संपादित/अपडेट/पुन्हा सबमिट करणे आवश्यक आहे. जर शेतकरी CSC द्वारे नोंदणीकृत असेल तर, शेतकऱ्याला अद्यतनासाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा लागेल. एकदा पुन्हा सबमिट/संपादित केल्यानंतर, शेतकरी अर्ज पुन्हा राज्याकडे मंजुरी/प्रमाणीकरणासाठी पाठवला जाईल.

एका शेतकऱ्याने CSC द्वारे स्व-नोंदणी करताना चुकीच्या पद्धतीने काही तपशील प्रविष्ट केले आहेत. शेतकऱ्याने अर्ज संपादित करण्याचा प्रयत्न केला असता रेकॉर्ड उपलब्ध होत नाही. कसे पुढे जायचे?

ज्या युजर आयडीद्वारे शेतकऱ्याची नोंदणी झाली होती त्याच युजर आयडीवर रेकॉर्ड दुरुस्तीसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे, ज्या शेतकऱ्याने CSC – A द्वारे नोंदणी केली आहे, तो CSC – B मध्ये अर्ज संपादित करण्यासाठी जाऊ शकत नाही.

पीएम-किसान अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदींचे तपशील प्रविष्ट करणे अनिवार्य आहे का?

होय, PM-KISAN अंतर्गत शेतकऱ्याने स्वत:ची नोंदणी करण्यासाठी जमिनीच्या नोंदीचे तपशील अनिवार्य आहेत. भूमी अभिलेख तपशील प्रविष्ट केल्याशिवाय, शेतकरी पोर्टलवर आपला अर्ज सादर करू शकणार नाही.

82 thoughts on “Namo Shetkari Yojana – Beneficiary Status, List, Registration, Intallment Check”

  1. मला 1 ही हप्ता मिळाला नाही तसेच पीएम किसान चे सर्व रेकॉर्ड ओके आहे पण पैसे मिळत नाहीत काय करावे

    Reply
  2. मला नमो चा एकाही हप्ता मिळाला नाही

    Reply
  3. माझ्या बाबानां पन नमो शेतकरी याचा लाभ मिळत नाही आहे😔

    Reply
  4. pm किसन चे 14 हप्त्या नंतर आमच्या गावात 50 शेतकऱ्यांचे कुठलेच हप्ते पडले नाही ना cm चे ना pm चे ता.येवला जी नाशिक तहसील ला तक्रार केली त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जायला लवलं तिथे कंपलेंट केली ते म्हणतात मंत्रालयातून प्रॉब्लेम आहे समजत नाही काय प्रॉब्लेम आहे

    Reply

Leave a Comment